मुंबई । नगर सहयाद्री - देशभरात प्रजासत्ताक दिन सुरू असतानाच पुण्यात तीन दुकानांना भीषण आग लागल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यातील स्वार...
मुंबई । नगर सहयाद्री -
देशभरात प्रजासत्ताक दिन सुरू असतानाच पुण्यात तीन दुकानांना भीषण आग लागल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात भंगार दुकान, रद्दी डेपो, आणि गादी दुकानांना ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात स्वारगेट परिसरात ही भीषण आगीची घटना घडली आहे. भंगार दुकान,रद्दी डेपो, आणि गादी दुकानांना ही भीषण आग लागली होती. याबद्दलची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ज्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आले आहे.
दरम्यान, दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून ही आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या भीषण आगीत आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र तिन्ही दुकाने जळून खाक झाली आहे.
COMMENTS