मुंबई । नगर सह्याद्री - विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस ब...
मुंबई । नगर सह्याद्री -
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला आहे. अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या अध्यात्मिक सेल कडून आंदोलन केले जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे कारण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केले होते. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते. असे अजित पवारांनी ठामपणे सांगितले होते. त्यांच्या या विधानावरून शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह भाजपच्या नेत्यांकडूनही राज्यात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. या आंदोलनात भाजपसह शिंदे गटातील नेते सहभागी होणार आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे.
मुंबई पुण्यासह आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलने केली जात आहे. दरम्यान, हीच बाब लक्षात घेता, अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
COMMENTS