निघोज येथील संकल्प लासेस अभिनव उपक्रम निघोज | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील निघोज येथील संकल्प लासेसने ५ वी शिष्यवृत्ती मध्ये प्रथम क्रम...
निघोज येथील संकल्प लासेस अभिनव उपक्रम
पारनेर तालुक्यातील निघोज येथील संकल्प लासेसने ५ वी शिष्यवृत्ती मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान देऊन अभिनव उपक्रम राबवला असून या लासेस मधील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी राधा निलेश झावरे हिच्या हस्ते २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यात आले.
प्रा. अन्सार पटेल यांच्या लासेसचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले होते. ज्यात राधा झावरे ही ५वी तर निखिल बोरसे हा ८ वी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. राधा झावरे ही जिल्ह्यात ४७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. संकल्प लासेस ३वर्षात निघोज परिसरात एक गुणवत्ता देणारा लास आहे. १२ वी सीईटी परिक्षेत ही मुले प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच मागील वर्षी झालेल्या १० वी परीक्षेत सर्व मुले ८२% च्या पुढे मार्स मिळवून उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला होता.
सदर कार्यक्रमास प्रा. पटेल, प्रा. पटेल, डेरे मामा, भाऊसाहेब लाळगे, संपत रसाळ, विशाल गुंड, भीमा लाळगे, अर्जुन लाळगे, सुरेश वराळ, विशाल लामखडे, निलेश झावरे, अबू तांबोळी, बाळासाहेब कवाद तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी लासेस मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून सन्मान करण्यात आला. तसेच निघोज परिसरातील ग्रामपंचायत, निघोज सोसायटी, मराठी शाळा, मुलिका देवी विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS