मुंबई । नगर सह्याद्री - नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनर किलिंगचा प्रकार आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील, भाऊ मामांनीच ...
मुंबई । नगर सह्याद्री -
नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनर किलिंगचा प्रकार आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील, भाऊ मामांनीच मुलीला मारून तिला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना पिंपरी महिपाल इथे घडली आहे. पिंपरी महिपाल येथील विद्यार्थींनी शुभांगीचे नांदेडच्या आयुर्वैदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत प्रेम प्रकरण होते. ही बाब तिच्या कुटुंबियांना कळाली तसेच यामुळे मुलीचे जमलेले लग्न मोडले आहे.
आपली बदनामी होत असल्याच्या रागातून वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भाऊ अश्या पाच जणांनी मुलीला ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळले आहे. लिंबगाव पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता काल रात्री ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
COMMENTS