मुंबई । नगर सह्याद्री - वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. नाशिकच्या जिंदाला कंपनीला भीषण आग लागली आहे. यात अन...
मुंबई । नगर सह्याद्री -
वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. नाशिकच्या जिंदाला कंपनीला भीषण आग लागली आहे. यात अनेक व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थशळी पोहचली असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार बॉयलरचा स्पोट झाल्याने कंपनीला आग लागली आहे. सदर घटनेची जी दृश्य समोर आली आहेत त्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. हवेत आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याचे दिसत आहे. अजूनही ही आग शांत करण्याचे काम सुरू आहे. तसेच आतमध्ये कंपनीचे अनेक कर्मचारी अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी , वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचे एक पथक, स्ट्रेचर, वार्ड बॉय देखील तयार केले आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सज्ज असल्याची माहिती शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे या गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. कंपनीत स्पोट झाला तेव्हा त्याची भीषणता इतकी होती की, आसपासच्या २० ते २५ गावांना मोठा आवाज ऐकू आला. कंपनीत साधारणता २००० कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इगतपुरीला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आता पर्यंत ९ ते १० जखमींना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra | Massive fire breaks out in a factory located in Mundegaon village of Igatpuri tehsil in Nashik district
— ANI (@ANI) January 1, 2023
Details awaited. pic.twitter.com/jQhSHqZCX7
COMMENTS