मुंबई । नगर सह्याद्री - कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना घडली आहे. एका सावकाराने कर्ज न फेडल्याने महिलांना अपशब्द वापरत धमकी दिली आहे. तसेच...
मुंबई । नगर सह्याद्री -
कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना घडली आहे. एका सावकाराने कर्ज न फेडल्याने महिलांना अपशब्द वापरत धमकी दिली आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी येथील महिलांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज फेडा अन्यथा वेश्याव्यवसाय करायला लावू अशी धमकी या सावकाराने दिली आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी गुंडांकडून महिलांना मारहाण करण्यात आली आहे. महिलांनी सावकाराकडून 25 लाख रुपयांच कर्ज घेतले होते. त्यावर आता सावकार जबरदस्तीने 85 लाख रुपयांची वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे.
वसुलीसाठी गुंड पाठवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी एकीकडे लोक आंदोलने आणि कायदे कठोर करत आहेत. मात्र दुसरीकडे अशा नराधमांमुळे महिलांना मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सावकार अशा पद्धतीने त्रास देत असल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. मात्र तिथे त्यांना कागदपत्र सादर करा असे सांगून निघून जाण्यास सांगितले आहे. पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचे महिलांच म्हणणे आहे. सावकाराने पाठलेल्या गुंडांकडून त्यांच्या घरातील सामानाचे देखील नुकसान करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या दोन मुलांना भीतीमुळे घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.
COMMENTS