मुंबई । नगर सह्याद्री - प्रवास करताना ट्राफिक लागल की प्रत्येकालाच त्रास होतो. वैतागही येतो. त्यामुळेच प्रवासात ट्राफिक लागणे म्हणजे कुणाला...
मुंबई । नगर सह्याद्री -
प्रवास करताना ट्राफिक लागल की प्रत्येकालाच त्रास होतो. वैतागही येतो. त्यामुळेच प्रवासात ट्राफिक लागणे म्हणजे कुणालाही संताप आणि चिड येणारंच, पण ट्राफिक लागलं आणि गाडी सावकाश सावकाश पुढे सरकत आहे. म्हणून बसून न राहता एका पठ्ठ्याने असा पराक्रम केला आहे. जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चारी बाजूंनी येणा जाणाऱ्या गाड्या आणि त्यात गाडीच्या टपावर बसून गड्याने केलेला पराक्रम सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. काय आहे हा व्हिडिओ, चला जाणून घेवू.
व्हिडिओमध्ये रस्त्यावर प्रचंड गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी झाल्याने सावकाश सावकाश पुढे सरकताना दिसत आहेत. मात्र या तरुणाने ट्राफिक लागले असताना थेट गाडीच्या वर बसून ग्लास काढून थेट दारु प्यायलाच सुरूवात केली. या तरुणाचा हा प्रताप पाहून लोकही थक्क होऊन पाहताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुरूग्रामधील असल्याचेही समोर आले आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी यावर तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काही जणांनी हा चेष्टेचा विषय नसून त्याला पोलिसात द्या अशाही प्रतिक्रिया दिल्या आहे. हा व्हायरल व्हिडिओ आत्तापर्यंत ९७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
COMMENTS