मुंबई । नगर सह्याद्री - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरील एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. खूप दिवसांपासून ह्या मालिकेने सगळ्...
मुंबई । नगर सह्याद्री -
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरील एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. खूप दिवसांपासून ह्या मालिकेने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून जात असल्याने चर्चेत आहे. अलीकडेच या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी मालिकेला निरोप दिला आहे. दरम्यान मालिकेच्या टीआरपीमध्येही घट झाली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून अनेक कलाकार बाहेर पडत आहे. तसेच मालिकेचा टीआरपी देखील घसरला आहे. यामुळे अनेकांना वाटतंय की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका बंद होईल. पण या मालिकेत रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाचा यावर विश्वास बसत नाही. तिच्या एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलाखत तिने जवळपास वर्षभरापूर्वी दिली होती.
प्रियाने या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे टीआरपी घसरण्याचे कारण त्याची गुणवत्ता नसून प्रेक्षकांचा बदलेल दृष्टिकोनातील आहे. ती म्हणाली, "मला टीआरपीचा खेळ कधीच समजला नाही, पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होण्याच्या मार्गावर आहे हे मला मान्य नाही."
"टीआरपीमध्ये चढ-उतार होत राहतात. कारण आजकाल प्रेक्षक फक्त टीव्ही मालिकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते इतरही अनेक गोष्टी पाहत आहे. त्यामुळेच ते मालिका तिच्या रोजच्या वेळेत टीव्ही पाहत नाही, जर टीव्हीवरील वेळेत मालिका पाहता अली नाही ते अॅप्सवर जाऊन मालिका पाहतात."
प्रिया यावेळी दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकानी आणि शोमधून बाहेर पडलेल्या इतर कलाकारांबद्दलही बोलले. ती म्हणाली, "होय, प्रेक्षकांचा एक विशिष्ट वर्ग असा असू शकतो जो तुम्ही साकारलेल्या पात्रांशी एकनिष्ठ असतो. मला वाटते की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेवर प्रेक्षकांची निष्ठा खूप जास्त आहे... कारण 90 टक्के प्रेक्षक ही मालिका नियमितपणे पाहतात."
प्रिया आहुजा ही दिग्दर्शक मालव राजदा यांची पत्नी आहे. तिने अलीकडेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला आहे. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले होते. तिने या मालिकेला अलविदा केला आहे. नुकताच मालव राजदानेही तारक मेहता का उल्टा चष्माला निरोप दिला आहे.
मालव आणि प्रिया यांच्याशिवाय या मालिकेमध्ये दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकानी बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब आहे. या मालिकेमध्ये तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी देखील मालिकेला रामराम केला आहे. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधी आणि त्याच्या जागी आलेला राज अनादकट यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटीही १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेपासून पासून दूर झाले आहे.
COMMENTS