मुंबई । नगर सह्याद्री - चीनच्या जिआंगशी राज्यातील नानचांग काउंटीमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजत...
मुंबई । नगर सह्याद्री -
चीनच्या जिआंगशी राज्यातील नानचांग काउंटीमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता येथे रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वीस जण जखमी झाले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रकचा चालक लोकांना चिरडत गेला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले बहुतांश लोक ठार किंवा जखमी झाले. घटनेच्या तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
धुक्यामुळे ट्रक ड्रायव्हर लोकांना पाहू शकला नाही. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केली. प्रवाशांनी फॉग लाइट्सकडे लक्ष द्यावे आणि सावकाश आणि सुरक्षितपणे गाडी चालवावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. लोकांनी रस्ता बदलणे आणि ओव्हरटेक करणे टाळावे. पादचारी आणि कारपासून अंतर ठेवा.
धुक्यामुळे रस्ते अपघात चीनमध्ये सामान्य आहे. याचे कारण तेथे वाहतुकीचे कडक नियम नाहीत. गेल्या महिन्यातच मध्य चीनमधील एका महामार्गावर अनेक वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS