मुंबई । नगर सह्याद्री - काल देशासह जगभरातील सर्व नागरिकांनी २०२२ या सरत्या वर्षाला अलविदा करत २०२३ या वर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केल...
मुंबई । नगर सह्याद्री -
काल देशासह जगभरातील सर्व नागरिकांनी २०२२ या सरत्या वर्षाला अलविदा करत २०२३ या वर्षाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले आहे. कलाकार मंडळींनी ही आपल्या बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत देशासह- परदेशात जात सुट्टीचा आनंद लुटला आहे.
शाहरुख खान आणि गौरी खान, मुलगी सुहाना खान, करीना कपूर खानसह इतर स्टार्सनीही नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले आहे. काही कलाकारांनी आपला नवा वर्षाचा संकल्पही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सुहानाने ३१ डिसेंबरच्या सायंकाळी सुर्यास्ताचा फोटो शेअर करत सरत्या वर्षाला अलविदा करत नव्या वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत केले. यावेळी तिच्यासोबत भाऊ अबरामदेखील होता. फोटोमध्ये, दोन्ही स्टार किड्सने बीचवर धम्माल मस्ती करत नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले.
तर दुसरीकडे करीना कपूर खाननेही परदेशात आपल्या परिवारासह नवीन वर्षाचे स्वागत केले. अभिनेत्री सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून तिच्यासोबत पती सैफ अली खान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खानही आहेत.
करीना कपूर खाननेही सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले. तिनेही सुर्यास्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच यावेळी मुलगा तैमूर आणि जहांगीरनेही नववर्षाचे स्वागत केले.
अनुष्का शर्माने देखील गेल्या वर्षातील तिचे काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहमीच अनुष्का तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, पण नववर्षाच्या स्वागतासाठीच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.
शेअर केलेल्या फोटोत अनुष्का कारमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. सर्व तिचे खास फोटो पती विराटने काढले आहेत, हे सांगण्यासाठी अनुष्का विसरली नाही. नववर्षाच्या स्वागतासाठी दोघेही सध्या दुबईत असून नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले आहे.
परदेशात राहून अनेक सेलिब्रिटींनी नवीन वर्षाचे स्वागत केले, तर हृतिक रोशनने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईत परतला आहे. तो विमानतळावर परतल्याचे काही खास व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. हृतिकसोबत विमानतळावर एक्स गर्लफ्रेड सबा आझाद आणि हृतिकचा मुलगाही होता. हे सर्व युरोपमध्ये सुट्टीचा आनंद लुटत होते.
COMMENTS