बेळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भविकांचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना
बेळगाव। नगर सह्याद्री -
बेळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भविकांचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.
हे सर्व भाविक पिकअप वाहनातून प्रवास करत होते. रामदुर्ग तालुक्यातील चींचनुर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ हा अपघात घडला आहे. वाहन झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला आहे. मृत व्यक्ती रामदुर्ग तालुक्यातील हुल कुंद गावाचे आहे.
हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावे आहे. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हे सर्व भाविक यल्लमा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिलं आणि गाडी थांबवली. त्याने भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असं सांगितलं. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
COMMENTS