मुंबई । नगर सह्याद्री - ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्कर आल्यामुळे बंडातात्य...
मुंबई । नगर सह्याद्री -
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्कर आल्यामुळे बंडातात्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यात आले होते. बंडातात्या यांना काल (12 जानेवारी) सकाळी त्रास जाणवू लागल्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले. कालच्या उपचारानंतर तात्यांची प्रकृती स्थिर झाली आहे.
COMMENTS