मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा उद्या कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा उद्या कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत काय होणार हे अजून अस्पष्ट आहे. कारण निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षप्रमुख पदाच्या मुदतवाढीबाबत किंवा निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहणार असे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाबाबत काय होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी मोठ विधान केले आहे. निवडणुक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ही औपचारिकता असून निकाल काहीही आला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख असतील, अस ते म्हणाले आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी ते आमचे शिवसेना पक्षप्रमुख राहतील. कायदेशीर लढाई सुरु आहे. ती सुरु राहील. मात्र उद्धव ठाकरे यांना आम्ही शिवसैनिक जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख मानतोय तोपर्यंत त्यांच्या पदाला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नाही. असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
COMMENTS