केडगाव येथे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरो...
केडगाव येथे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मॅरेथॉन स्पर्धा
विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळावे, जेणेकरूनआता क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे. जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. खेळाडूंना आता शासनाच्या वतीने नोकरीमध्ये आरक्षण दिले जाते. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धेच्या आयोजन करून क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. नगरसेवक मनोज कोतकर यांचे विकास कामाबरोबर क्रीडा क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. होतकरू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
केडगाव येथे माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुपच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक मनोज कोतकर, आयोजक बच्चन कोतकर, अजित कोतकर, सुनील कोतकर, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, बाबासाहेब कोतकर, अशोक कराळे, सागर सातपुते, भूषण गुंड, महेश गुंड, गणेश सातपुते, सोपान सातपुते, अनिल ठुबे, सचिन ठुबे, सुनील ठुबे, सोनू घेमुड, छबु कोतकर, नवनाथ कोतकर, प्रवीण अकोलकर, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब मतकर, अशोक नरवडे, विशाल भिंगारदिवे, सतीश खैरे, संदीप भोर, प्रसाद जमदाडे, प्रसाद आंधळे, सुहास साळुंखे, पप्पू पाठक, राजन कदम, तुषार कदम, तुषार कोतकर, पप्पू मतकर, पोपट कराळे, अतुल कोतकर, नंदू वाहवळ, गणेश तोडमल, सचिन प्रभुणे आदी उपस्थित होते. नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांना खेळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वर्षभर विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विजेत्या खेळाडूंना सायकल बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विजेते खेळाडू पुढील प्रमाणेछोटा गट मुले- आनंद संतोष काळे, महेश एकनाथ माळी, शुभम संतोष कोतकर. मोठा गट मुले- अजय मच्छिंद्र गायकवाड, किशोर विठ्ठल मरकड, विक्रम भिमराज बोरुडे. लहान गट मुली- अप्रिता अजय भंडारी, जानवी श्रीराम सांगळे, संस्कृती अजिनाथ क्षीरसागर, वनश्री अंकुश लष्करे (दोघीना विभागून).
COMMENTS