मुंबई । नगर सह्याद्री - उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहूजन आघाडी पक्ष ठाकरे गटासोब...
मुंबई । नगर सह्याद्री -
उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहूजन आघाडी पक्ष ठाकरे गटासोबत युती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबत संकेत मिळत आहे. मात्र, दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बुधवारी बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तृळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
ठाकरेंसोबतच्या आघाडीवर मन वळिवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि आंबेडकर यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली.
वर्षा निवास्थानी दोघांची भेट झाली आहे. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दोघांमध्ये नेमकं काय शिजलं? असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
COMMENTS