काळकूप येथे ‘सीताफळ’ पीकासंदर्भात परिसंवाद भाळवणी | नगर सह्याद्री पुढील काळात माणसाला आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रथम शेतकर्यांनी...
काळकूप येथे ‘सीताफळ’ पीकासंदर्भात परिसंवाद
भाळवणी | नगर सह्याद्री
पुढील काळात माणसाला आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रथम शेतकर्यांनी आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
पारनेर तालुयातील काळकूप येथे गणेश चतुर्थी निमित्त ’गोल्डन’ सिताफळ लागवडीसंदर्भात परिसंवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ’गोल्डन’ एम एन के १ या सिताफळ जातीचे संशोधक नवनाथ कसपटे यांच्या परिसंवादाचे आयोजन येथील सिताफळ उत्पादक शेतकर्यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कसपटे यांनी सिताफळ पिकाच्या लागवडीपासून ते छाटणी, फळधारणा, मात्रा, संजिवके, पाणी व्यवस्थापन, काढणीपश्चात प्रतवारी, विक्रिसाठी मार्केटची व्यवस्था या संदर्भात सचित्र माहिती दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, कृषी अधिकारी गावखरे तसेच इतर कृषी सहाय्यक, महिला कृषी सहाय्यीका आदी उपस्थित होते. याप्रसंगी पानोली येथील बाळासाहेब गाडेकर, राळेगण थेरपाळ येथील बाळासाहेब कारखिले यांचे खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन, नाशिक येथील सुरेश वाघ, काळकूप येथील आण्णासाहेब अडसुळ, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांचेही मार्गदर्शन यावेळी शेतकर्यांना झाले.
यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजी तरटे, सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. आबासाहेब चेमटे, सेवानिवृत्त वाहतुक निरीक्षक विलास कांडेकर, इंद्रायणी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक सोपानराव लोंढे, पाडळीचे माजी सरपंच हरिष दावभट, सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक सोपानशेठ वाळुंज, महांडूळे भाऊसाहेब, आदर्शगाव हिवरे बाजार येथील एस.टी. पादीर, रोहीदास पादीर, आबासाहेब मते, काळकूपचे सरपंच भागाजी कदम, आर.डी. अडसुळ, प्रगतशील शेतकरी अशोकराव शिंदे, भानुदास तरटे, आप्पासाहेब पवार, राधाकृष्ण पवार सर, शिवाजी अडसुळ, पाराजी शिंदे, प्रविण अडसुळ, प्रमोद मते, संजय कदम, सुनिल अडसुळ, माधव खरमाळे, विठ्ठल कदम, बाबासाहेब अडसुळ, भाऊसाहेब अडसुळ, संजय अडसुळ, भास्कर अडसुळ, बाळासाहेब अडसुळ आदींसह महिला व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी भाळवणी येथील इंद्रायणी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक सोपानराव लोंढे यांनी शेतकर्यांना माहिती देण्यासाठी स्क्रीनच्या गाडीची व्यवस्था केली होती तर सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक सोपानशेठ वाळुंज यांच्यावतीने शेतकर्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले तसेच वाशी (मुंबई) येथील गणेश दर्शन फ्रुट मर्चंट कंपनीचे संचालक किसन दुराफे यांच्यावतीने उपस्थित शेतकर्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील सिताफळ उत्पादक तरुण शेतकर्यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतशील शेतकरी आबासाहेब मते यांनी कले, सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार सरपंच भागाशेठ कदम यांनी आभार मानले.
COMMENTS