नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हळदी-कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री आजची महिला अनेक आघाड्यांवर आपल्या क...
नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हळदी-कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्रीआजची महिला अनेक आघाड्यांवर आपल्या कर्तृत्वाने कुटूंब, नोकरी, व्यवसाय सक्षमपणे सांभाळत आहे. परंतु हे करत असतांना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यासाठी महिला स्वत: सक्षम व मजबूत राहिल्यास समाज व्यवस्थाही मजबूत होईल. महिलांनी महिलांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. विविध सामाजिक कार्यात महिला काम करत आहेत, त्या माध्यमातून महिलांचा विकास होत आहे ही दिलासादायक बाब आहे. सण-समारंभातून भारतीय संस्कृती जपण्याचे काम महिलांकडून होत आहे. यानिमित्त महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठीचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यावतीने तिळगुळ, हळदी-कुंकू समारंभाचे उद्घाटन महापौर शेंडगे यांच्या हस्ते तुलसी मातेला पाणी अर्पण करुन करण्यात आले. यावेळी माजी महापौर सुरेखा कदम, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, चैताली बोराटे, प्रियंका गायकवाड, लक्ष्मी जाधव, आशा जाधव, मंगल जाधव, स्नेहल जाधव, डॉ. प्राजक्ता जाधव, अंजली जाधव, मानसी जाधव, मीना सत्रे, कावेरी सत्रे, पुजा सत्रे, सातव आदी उपस्थित होते.
नगरसेविका सुवर्णा जाधव म्हणाल्या, तिळगुळ आणि हळदी-कुंकू समारंभ महिलांसाठी एक व्यासपीठ असते. त्या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण होऊन महिलांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यास मदत होते. महिलांनी कर्तृत्त्व सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त ही संधी मिळत असल्याने अशा उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. अशा उपक्रमांतून सामाजिक दायित्व जपून निसर्ग संवर्धन, आरोग्य विषयक मार्गदर्शन व कर्तुत्वान महिलांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जाते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांप्रती प्रेम, आदरभाव व्यक्त करुन, स्नेह वाढविला पाहिजे. आपल्या संस्कृतीत सण-उत्सवाला महत्व असल्याने महिलांनी उत्साहाने सहभागी व्हावे.
यावेळी सुरेखा कदम, गीतांजली काळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दिप्ती शुक्रे यांनी केले. आभार डॉ.प्राजक्ता जाधव यांनी मानले. यावेळी एक मिनिट शो, सेल्फी पॉईंट, लकी ड्रॉचे आयोजन केले होते. विजेत्यांना बक्षिसे देवून सन्मानित केले. कार्यक्रमास देवकी भापकर, जयश्री भोजने, मयुरी कटारिया, जयश्री खांडेकर, अबोली आगरकर, निकिता ताठे, कल्पना भळगट, अर्चना परकाळे आदी उपस्थित होते.
COMMENTS