बाभुळवाडा येथे श्रमसंस्कार शिबिराद्वारे विविध उपक्रम निघोज | नगर सह्याद्री राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्य...
बाभुळवाडा येथे श्रमसंस्कार शिबिराद्वारे विविध उपक्रम
राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे मत राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पोपट सुंबरे यांनी सांगीतले. या शिबिरात एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर बाभूळवाडे येथे संपन्न झाले असून या शिबिरामध्ये, ग्राम स्वच्छता अभियान, वनराई बंधारे, वृक्षारोपण, महिला सबलीकरण, आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, सामाजिक प्रबोधन, ग्राम सर्वेक्षण अभियान, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास प्रबोधन रॅली, स्त्री भ्रूण हत्या, मतदार जागृती, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापण असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच गावात तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेचे नियोजन केले.
गावच्या सरपंच वैशाली जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब नवले, श्रीराम पवार, आपले गाव फौंडेशन अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर, मुख्याध्यापक दत्तात्रय लोंढे यांनी समाधान व आनंद व्यक्त केला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ विभागीय समन्वयक प्राध्यापक दशरथ पानमंद, प्राध्यापक सोनवणे उपस्थित होते. तसेच या शिबिरात प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, शिवव्याख्याते प्राध्यापक ज्ञानेश्वर कवाद, डॉ. रफीक सय्यद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण अधिकारी डॉ. सुनील पोटे कवी व राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त डॉ. हरीश शेळके, मराठी साहित्याचे स्पष्ट वक्ते डॉ. नंदकुमार उदार, पारनेर तालुका कवी मंच तुषार ठुबे यांनी यांनी भेट दिली.
तसेच महाविद्यालयातील डॉ. गोविंदराव देशमुख, प्राध्यापक प्रा. विशाल रोकडे, प्राध्यापक अक्षय अडसूळ, प्राध्यापक आनंद पाटेकर, प्राध्यापक अशोक कवडे, प्राध्यापक सचिन निघूट, प्राध्यापक मनीषा गाडीलकर, प्राध्यापक स्वाती मोरे, प्राध्यापक नूतन गायकवाड, प्राध्यापक संगीता मांडगे, प्राध्यापक सुमित गुणवंत, प्राध्यापक तुषार जगदाळे, प्राध्यापक नीलिमा घुले, अपेक्षा लामखडे, प्राध्यापक वैशाली फंड, प्राध्यापक प्रियंका लामखडे, प्राध्यापक श्रद्धा ठुबे, प्राध्यापक दौंडकर, प्राध्यापक थोरात यांनी भेट दिली.
यावेळी आपले गाव फौंडेशन अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर यांनी सांगितले की गेली आठ दिवसांत मुलिका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाव आपलेसे केले. या परिसरातील विकास, ग्रामस्थ तसेच सर्वांशीच समन्वय साधीत विद्यार्थ्यांनी गाव व परिसरात विविध उपक्रम राबवून एक आदर्श गाव कसे असावे याचा प्रत्यय आणून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक आदर्श महाविद्यालय उभे करुन शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले असून गौरवास्पद काम केले असल्याचे प्रतिपादन डॉ. खणकर यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS