निघोजमध्ये कँडल मार्च निघोज | नगर सह्याद्री संदीप पाटील वराळ यांच्या गुन्हेगारांना येत्या वर्षदिडवर्षात न्यायालय फाशीची शिक्षा सुनावेल अस...
निघोजमध्ये कँडल मार्च
संदीप पाटील वराळ यांच्या गुन्हेगारांना येत्या वर्षदिडवर्षात न्यायालय फाशीची शिक्षा सुनावेल असा विश्वास संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिला आहे.
निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची सहा वर्षांपूर्वी २१ जानेवारी २०१७ रोजी एस टी बस स्थानक परिसरात निघृण हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ निघोज येथे प्रत्येक वर्षी दि. २१ जानेवारी हा काळा दिवस पाळण्यात येतो. या दिवशी गावातील व्यवहार बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता संदीप पाटील चौक, नवी पेठ,एस टी बस स्थानक परिसर, जुनी पेठ, मंळगंगा मंदीर ते ग्रामपंचायत चौक पर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी रात्री साडेसात ते साडेआठ वाजता श्रद्धांजली सभा घेऊन कँडल मार्च मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत ग्रामस्थ, कार्यकर्ते, संदीप पाटील वराळ यांचा मित्रपरिवार अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. संदीप पाटील वराळ यांच्या जिवणावर आधारित गित तसेच संदीप पाटील अमर रहे या घोषनांनी परिसर निनादून गेला होता. यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत विविध गावांतील मान्यवरांनी आपल्या भावना मनोगत व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले गेली सहा वर्षांपूर्वी संदीप पाटील वराळ यांची निघृण हत्या करुन मारेकर्यांनी सर्वसामान्य जनतेला आधार देणार्या संदीप पाटील वराळ यांना आपल्यातून हिरावून नेले आहे. गेली आठ वर्षात निघोज व परिसराचा कायापालट करताना अल्पसंख्याक समाज असो की सर्वसामान्य जनतेला पाठबळ देण्याचे काम करीत त्यांनी जनाधार मिळवीला होता. सध्या हा खटला न्यायप्रविष्ट असला तरी या खटल्याचा निकाल येत्या वर्षदिडवर्षात लागेल व यातील गुन्हेगारांना न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदिप वराळ, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, दिनेश बाबर, सरपंच चित्राताई सचिन वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, रंगनाथ वराळ पाटील, सरपंच पंकज कारखिले, सरपंच प्रविण उदमले, भास्कर उचाळे, दैनिक नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, चेअरमन स्वप्नील मावळे, माजी सरपंच अशोक शेळके, माजी सरपंच शिवाजी पवार, विठ्ठल चौधरी, सुभाष गाडीलकर, अध्यक्ष किरण ठुबे, उद्योजक दादा गुंड आदिंनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
शेवटी मुंबई बँकेचे अधिकारी सुनील पवार यांनी व्यापारी, व्यवसायीक, ग्रामस्थ यांनी बंदमध्ये सहभागी होऊन तसेच कँडल मार्च व श्रद्धांजली सभेस मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.
COMMENTS