नाशिकचे किमान तापमान ९ अंशांवर! नाशिक | नगर सह्याद्री काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कायम आहे. शीतलहरींमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली अस...
नाशिकचे किमान तापमान ९ अंशांवर!
काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कायम आहे. शीतलहरींमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली असून, किमान तापमान एक आकडी राहाते आहे. बुधवारी (ता. ११) नाशिकचे किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या आठवडाभरापासून नगरमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे.
तर कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आलेली आहे. थंडीपासून बचावासाठी स्वेटर, जॅकेटसह शॉलचा आधार नाशिककरांकडून घेतला जात आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून वातावरणात गारवा जाणवत होता. गेल्या दोन-तीन दिवसांत पारा खालावल्याने व त्यातच वातावरणात शीतलहरी वाहत असल्याने गारव्याचा अनुभव नाशिककरांना येत होता.कमाल तापमानात कमालीची घसरण झालेली होती. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. बुधवारी कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, ३०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे.किमान तापमान एकआकडी राहात असल्याने सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवत होता. शेकोटी पेटवत नाशिककरांनी गारठ्यापासून बचाव करण्यावर भर दिला. पुढील काही दिवस वातावरणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यत केला जात आहे.
COMMENTS