चार वर्षांत दुसर्यांदा प्रयत्न: चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेची नगर तालुक्यातील वाळकी (त...
चार वर्षांत दुसर्यांदा प्रयत्न: चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेची नगर तालुक्यातील वाळकी (ता. नगर) येथील शाखा चार वर्षानंतर दुसर्यांदा चोरटयांनी फोडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेत बॅकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. चार वर्षांपूर्वी असाच बँक फोडून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला होता. चार वर्षानंतर दुसर्यांदा ही घटना गुरूवारी (दि. २६) घडली.
चोरटयांनी बॅकेच्या मुख्य दरवाजाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला.आतील सीसीटीव्ही कॅमेर्याची मोड तोड केली. त्यानंतर चोरटयांनी कागदांची उचकापाचक करत आपला मोर्चा तिजोरीकडे वळविला. तिजोरी फोडायला गेले असतानाच सायरन वाजू लागला. त्यामुळे चोरटयांनी बॅकेतून धूम ठोकली. बँकेच्या बाहेरील उंच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बॅकेच्या दरवाजा पर्यन्त माग काढला. तेथून पुढे अवकाळी पाऊस झाल्यामुळे श्वानाला माग काढता आला नाही. ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास नगर तालुका सहाय्यक पोलीस निरक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, भास्कर लबडे करीत आहेत.
वाळकीतील सहकार बँक शाखेला रात्री सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे चार वर्षानंतर पुन्हा दुसर्यांदा बँक फोडण्याचे धाडस चोरटे प्रयत्न करत आहेत. आतील सीसीटीव्ही चोरट्यानी फोडले असले तरी बाहेरील उंचावर असलेल्या सीसी टिव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत.
COMMENTS