मुंबई । नगर सह्याद्री - सदावर्तें यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू कराव...
मुंबई । नगर सह्याद्री -
सदावर्तें यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपा शिंदे गटासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार केली आहे. तर वकिल गुणरत्न सदावर्तेंनी थेट दाऊदवरचे निशाणा साधला आहे.
मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपा नेते प्रविण दरेकर, चित्रा वाघ, आशिष शेलार, केशव उपाध्ये यांच्यासह गुणरत्न सदावर्तेही उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पाकिस्तानच्या निच विचारामधून जे लव जिहाद चालू झाले आहे. त्या लव जिहादला दफण करण्यासाठी मुंबईमधला हिंदू एकवटला आहे. अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंनी हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांच्या तोंडाला आजार झाला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग ते लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत? हैद्राबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही? या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. असे म्हणत सदावर्तेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.
मुंबईत आयोजित केलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्च्यात नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या मोर्च्यात लव्ह जिहादविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच धर्मांतरविरोधी कायदा आणावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
COMMENTS