सरपंच प्रकाश गुंड, बाबुर्डी ग्रामस्थांच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन सुपा | नगर सह्याद्री पारनेर एसटी आगारा मार्फत विद्यार्थ्यांच्या ...
सरपंच प्रकाश गुंड, बाबुर्डी ग्रामस्थांच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन
सुपा | नगर सह्याद्रीपारनेर एसटी आगारा मार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सोडण्यात येणार्या एसटी बसेसच्या वेळापत्रकात गरजेनुसार बदल करावा अशी मागणी बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड यांनी केली आहे. याबाबत पारनेर आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी एसटी बसने मोठ्या संख्येने पारनेर येथे तालुयाच्या ठिकाणी जातात. गेली दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळाच्या वतीने सर्व बसेस बंद करण्यात आल्या. अतिशय कडक लॉकडाऊन असल्याने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.
चालू शैक्षणिक वर्षापासून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सोडल्या जाणार्या बसेसच्या फेर्या उशिरा सुरू केल्या. मात्र त्यात सतत अनियमितता आढळून येत असल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पारनेर आगार तर्फे विद्यार्थ्यांसाठी सोडल्या जाणार्या बसेसच्या फेर्या सध्या विद्यार्थ्यांच्या गैरसोयीच्या ठरत आहे.
त्यामुळे बाबुर्डी, रूईछत्रपती, भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव येथील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज मध्ये विहीत वेळेत पोहचणे शय होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याच बरोबर शाळा, कॉलेजची वेळ संपल्यानंतर त्यांना विनाकारण वेळेचा अपव्यय करून पारनेर एसटी डेपो परीसरात तासंतास ताटकळत बसावे लागते. आपण विहीत वेळेत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना लवकर घरी येणे शय होईल व त्यांचा अभ्यास देखील पूर्ण होईल.
बाबुर्डी गावाकरीता आपणाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एसटी बसेसच्या वेळेत व फेरीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड, मेजर किशोर लगड, लाला भोंडवे, रणजित दिवटे, प्रतीक दिवटे, संकेत गारकर, सूरज दिवटे, रोहन गाडगे, संकेत भोंडवे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS