मुंबई । नगर सह्याद्री - रोहित पवार धीरज शास्त्री यांच्यावर भडकले आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव...
मुंबई । नगर सह्याद्री -
रोहित पवार धीरज शास्त्री यांच्यावर भडकले आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोलले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराज शास्त्री आपल्या दरबारात अनेक चमत्कार करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन ते वादात सापडले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी माफीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
'बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहे. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजरा'.
COMMENTS