अहमदनगर | नगर सह्याद्री पोलीस शिपाई पदासाठी बुधवारी ११५५ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात ७९१ जणांनी चाचणीसाठी हजेरी ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पोलीस शिपाई पदासाठी बुधवारी ११५५ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात ७९१ जणांनी चाचणीसाठी हजेरी लावली. यातील ३९ जणांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित ७५२ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई, चालक पदाच्या १३९ जागेसाठी २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू आहे. गुरूवारी ११६० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविले. शुक्रवार व शनिवारी मुलींसाठी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी एक हजार मुलींना चाचणीसाठी बोलविले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
COMMENTS