रिलीजपूर्वीच पठाण ऑनलाइन लीक:हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पहिला शो रद्द

मुंबई । नगर सह्याद्री -  पठाण चित्रपटमुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाद झाले आहे. अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट बुधवारी देशभरात 5 हजार ...


मुंबई । नगर सह्याद्री - 

पठाण चित्रपटमुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाद झाले आहे. अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट बुधवारी देशभरात 5 हजार 200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे. तर कुठे विरोध होत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधामुळे पहिला शो रद्द करण्यात आला आहे. बिहार आणि यूपीमध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाचे पोस्टर्स फाडण्यात आले आहे.

थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या एक दिवस आधी पठाण ऑनलाइन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिल्मच्या पायरेटेड कॉपी Filmyzilla आणि Filmy4wap वर उपलब्ध आहे. चित्रपट निर्मात्यांनी चाहत्यांना चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच चित्रपटगृहात चित्रपटाची व्हिडिओग्राफी करू नका आणि कोणाशीही शेअर करू नका, असेही सांगितले आहे.

पठाण चित्रपटासोबतच 25 सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलही पुन्हा सुरू झाले आहे. जे कोविडच्या काळात काही कारणास्तव बंद पडले होते. यावर आनंद व्यक्त करत शाहरुखने सोशल मीडियावर ट्विट करत त्या सर्व सिंगल स्क्रीन्सना शुभेच्छा दिल्या आहे.

इंदूरमध्ये पठाणचा पहिला शो होण्यापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली. सिनेमातील पहिला शो रद्द करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. पठाण चित्रपट न चालवण्याचा इशारा दिला. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. असा दावा आयुक्तांनी केला आहे. चित्रपटगृहांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रतलाममध्येही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला विरोध केला आहे.

पठाणच्या रिलीजला कर्नाटकातही अनेक ठिकाणी विरोध होत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली. त्याची पोस्टर्स जाळली आहे. भागलपूरमध्ये पठाण चित्रपटाचे पोस्टर जाळण्यात आले आहे. या रिलीजला हिंदू संघटना विरोध करत आहे. बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या- फिल्म चलेगा, हॉल जलेगा. या चित्रपटात सनातनच्या विरोधात दृश्ये असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सनातन धर्माचा अवमान झाला आहे. मात्र, पोलिस-प्रशासनाने हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सुरक्षा पुरवली जाईल, असे सांगितले आहे.

COMMENTS

Name

Accident,36,Ahmednagar,7246,Akole,20,braking,44,Breaking,5120,Business,4,corona,561,Crime,1437,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1333,Epaper,29,Health,396,indan,8,India,1218,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4850,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3022,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,132,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,127,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: रिलीजपूर्वीच पठाण ऑनलाइन लीक:हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पहिला शो रद्द
रिलीजपूर्वीच पठाण ऑनलाइन लीक:हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पहिला शो रद्द
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh9Dp6nzEYwjnaI2f1IU58xxz8L40Jwm_YGV-GaBrlqJX8jQ0i2LD-NpQUzok4RhJpB4w1B6jchQ1ecsVoc-AnfPgcgCM47XVz3_Md7Cjf4cNqkxyr4UGb_LgLeWvAfYOZjdq-H3bqdNu2PEEI7ZplQTX_fi57-3YABxNumcPNpqe2aOy7oYWaQaDSL/s16000/Capture.PNG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh9Dp6nzEYwjnaI2f1IU58xxz8L40Jwm_YGV-GaBrlqJX8jQ0i2LD-NpQUzok4RhJpB4w1B6jchQ1ecsVoc-AnfPgcgCM47XVz3_Md7Cjf4cNqkxyr4UGb_LgLeWvAfYOZjdq-H3bqdNu2PEEI7ZplQTX_fi57-3YABxNumcPNpqe2aOy7oYWaQaDSL/s72-c/Capture.PNG
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/news-Pathan-leaked-online-even-before-its-release.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/news-Pathan-leaked-online-even-before-its-release.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content