केडगावच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप: उद्योजक जालिंदर कोतकर यांचा उपक्रम अहमदनगर | नगर सह्याद्री सर्वसामान्य घटकांतील...
केडगावच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप: उद्योजक जालिंदर कोतकर यांचा उपक्रम
अहमदनगर | नगर सह्याद्रीसर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्य घटकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. केडगावमधील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
उद्योजक जालिंदर कोतकर यांच्या वतीने केडगावमधील प्रत्येक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप उपक्रमाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त निशा उद्योग समूह व भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानाचे प्रारंभ केडगावच्या सरस्वती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, भूषण गुंड, प्रसाद आंधळे, गणेश आनंदकर, अजित कोतकर, संभाजी पवार, बच्चन कोतकर, प्रदीप बरबडे, सुनील कोतकर, भरत ठुबे, पिंटू लगड, बाबा कोतकर, सोनाजी घेंबूड, महेश गुंड, सागर पालवे, गणेश सातपुते, सागर सातपुते, अशोक कराळे, मनोज येरकर आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमाद्वारे कार्यकर्ते त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा जपत आहे. कोतकर यांनी शेवटच्या घटकांना आधार देण्याचे काम केले, हाच वैचारिक वारसा घेऊन सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजक जालिंदर कोतकर म्हणाले की, लवकरच विद्यार्थी परीक्षांना समोरे जाणार आहेत. दोन वर्षापासून शाळा बंद होत्या, तर कोरोनामुळे सर्वसामान्याची आर्थिक परिस्थिती देखील बिकट आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व संदीप कोतकर यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर यांनी शाळेची माहिती देऊन शालेय पॅड वाटपच्या उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय अर्चना कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. आभार रवींद्र चोभे यांनी मांनले.
COMMENTS