निघोज | नगर सह्याद्री लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आळकुटी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्...
निघोज | नगर सह्याद्री
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आळकुटी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग, महाराष्ट्र शासन शिक्षण संचनालय उच्च शिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. दिपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध पोस्टर्स आणि साहित्यिकांचे फोटो लावून महाविद्यालयाची सजावट करण्यात आली. निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शब्दकोडे व एकांकिका कथा, नाट्यवाचन, वाकप्रचार व म्हणी, पटकथा काव्यवाचन, रांगोळी स्पर्धा, आदि उपक्रम राबविण्यात आले आहेत.
सदर उपक्रम, कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद पारखे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहेत. भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाविद्यालयास स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष भास्करराव शिरोळे, भाऊसाहेब डेरे, महेश शिरोळे, प्रा. अर्जुन चाटे आदि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यावेळी मराठी भाषा संवर्धनासाठीची आपली भुमिका मनोगतातून व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद पारखे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून विदयार्थ्यांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ही केले. भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. कुंदा कवडे व प्रा. स्वाती फापाळे यांनी केले आहे. भाषा संवर्धन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदविला आहे.
COMMENTS