हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ उत्साहात निघोज | नगर सह्याद्री विधवांचा सन्मान करणे सामाजिक जबाबदारी असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्या सोनाली सालके...
हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ उत्साहात
निघोज | नगर सह्याद्रीविधवांचा सन्मान करणे सामाजिक जबाबदारी असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्या सोनाली सालके पाटील यांनी व्यक्त केले.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा महिलेला सामावून घेतले जात नाही. सनातन संस्कृतीमध्ये अतिशय जाचक नियम असून त्यांचा पगडा आज देखील २१ व्या शतकात प्रकर्षाने दिसतो. अशा विचारांना फाटा देत जवळे येथील ग्रामपंचायत सदस्या सोनाली संदीप सालके पाटील यांनी हळदी कुंकू, तिळगुळ समारंभात विधवा महिलांना प्रमुख अतिथी म्हणून तसेच हळदी कुंकू, ओटीचे सामान, साडी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या या उपक्रमाला इतर महिलांनी दुजोरा देत त्यांनीही या महिलांचा सन्मान केला.
यावेळी महिलांनी सालके यांच्यासोबत प्रतिज्ञा केली की कुठल्याही महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर आम्ही तिचे कुंकू पुसणार नाही, त्याच्या बांगड्या फोडणार नाहीत व तिचे सौभाग्य अलंकार काढून घेतले जाणार नाहीत. सण समारंभात त्या महिलेला सन्मानाची वागणूक देऊ आणि विधवा प्रथा बंदीच्या निर्णयांत सक्रिय सहभाग ठेवू.
यावेळी सोनाली सालके म्हणाल्या, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा काळ अतिशय संघर्षाचा होता. यावेळी देखील समाजामध्ये सतीची प्रथा रूढ होती, त्यावेळीही इतिहासातल्या महान स्त्रियांनी सती प्रथेला विरोध केला नसता तर कदाचित आज देखील अनेक महिला बळी पडल्या असत्या. तितका संघर्ष आजच्या काळात राहिलेला नाही. एकविसाव्या शतकात देखील आपण महिला भगिनी सुवासिनी आणि विधवा असा भेदभाव करत असू तर महिला वर्गाला लाजिरवाणी गोष्ट आहे. सावित्रीबाईंनी अंगावरती शेण व चिखलाचे गोळे झेलले ते महिलांनी शिकून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी. कदाचित त्यावेळेसचा संघर्ष या दोन महान महिलांनी केला नसता आज महिला सामाजिक बेड्यांत अडकून पडल्या असत्या. आपण सर्वांनी एखाद्या पतीच्या निधन झालेल्या महिलेला सन्मानाची वागणूक द्यावी तिचा आत्मविश्वास दृढ करावा यासाठी आपण प्रेरणा द्यावी.
पाणी वापर संस्थेच्या संचालिका आरती पठारे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. खेलो इंडिया मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मीनाताई पठारे यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी प्राविण्य मिळवल्याबद्दल यांचा देखील ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
विधवा महिलांना सन्मान मिळावाविधवा महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळावी या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला. जवळा ग्रामपंचायत विधवा महिला सन्मान मिळण्यासाठी ठराव ग्रामसभेत संमत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.-सोनाली सालके, ग्रामपंचायत सदस्या जवळे
COMMENTS