निघोज | नगर सह्याद्री मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यामध्ये शेळी ठार झालीे. ही घटना निघोज परिसरातील कुंड वस्ती, ठ...
मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यामध्ये शेळी ठार झालीे. ही घटना निघोज परिसरातील कुंड वस्ती, ठुबे वस्तीवर घडली असून अशोक नंदराज वराळ यांची शेळी या हल्ल्यात ठार झाली आहे. बिबट्याच्या वास्तव्याने या परिसरात घबराट पसरली असून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी या परिसरातील वनविभागाने पिंजरा उपलब्ध करून शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे यांनी केली आहे.
याबाबत वराळ पाटील यांनी तातडीने वन अधिकार्यांशी संपर्क करीत पंचनामा करून शेतकरी वराळ यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर वनकर्मचारी जगताप हे दुपारी ११ वाजता घटनास्थळी आले व त्यांनी जागेची पाहणी करीत तसेच मृत्यू पावलेली शेळीचा पंचनामा केला. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, श्रीकांत पवार, शेतकरी राजू वराळ हे उपस्थित होते. घराजवळ असणार्या गोठ्यामधील शेळीवर झालेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. वनविभागाने तातडीने याची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी यांनी केली आहे.
परिसरातपिंजरे लावा
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्यांना रात्रीचे शेतीला पाणी भरता येत नाही. तसेच सकाळी सहाच्या व रात्री नऊ वाजता फिरण्यासाठी जाणार्या ग्रामस्थांची गर्दी कमी झाली आहे. या परिसरातील पिंजरे देउन वनविभागाने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
COMMENTS