पवार कुटुंबियांचे हत्याकांड निघोज | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या सात जणांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्य...
पवार कुटुंबियांचे हत्याकांड
गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या सात जणांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने ग्रामसभेत करण्यात आली. दरम्यान पवार हत्याकांडातील मृतांना ग्रामसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निघोज येथील ग्रामसभा संपन्न झाली. सरपंच चित्राताई वराळ पाटील या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामसभेत ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांनी निघोज व परिसरातील विकासकामांची माहिती दिली. लंपी आजारावर दक्षता घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झावरे यांनी जनावरांवर तातडीने उपचार करीत कार्यक्षमतेने काम केल्याबद्दल निघोज ग्रामसभेत त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने दैनिक नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे, सतिष साळवे, अस्लमभाई इनामदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, निलेश घोडे, विलासराव हारदे, रवि रणसिंग, रोहित पठारे, अक्षय वरखडे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी लंपी आजारावर डॉ. झावरे यांनी तातडीने लसिकरण करुन जनावरांमध्ये ही साथ पसरणार नाही. यासाठी दक्षता घेतली. याबद्दल अभिनंदन केले व डॉ. झावरे यांचा ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत वतीने सत्कार केला. सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोनत्याही प्रकारे विकासकामांचे विषय झाले नाहीत. ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS