मुंबई । नगर सह्याद्री - साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग लागली आहे. वायर गल्लीमध्ये ज्वलनशील असलेलया वायरची विविध गोदामे आहे. यातील त...
मुंबई । नगर सह्याद्री -
साकीनाका येथील वायर गल्लीमध्ये भीषण आग लागली आहे. वायर गल्लीमध्ये ज्वलनशील असलेलया वायरची विविध गोदामे आहे. यातील तीन ते चार गोदमना ही आग लागली आहे. सध्या घटनास्थळी 3 ते 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहे.मात्र आग वाढत जात असल्याने विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 गोदमांना ही आग लागली आहे. सध्या घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तर कुलिंगचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीविहानी झाली नाही मात्र मोठी वित्तहानी झालेली आहे.
COMMENTS