गोरेगावला विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार पारनेर | प्रतिनिधी मॉडेल व्हिलेज गोरेगाव विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी तालुयातच नव्हे तर जिल्ह्यात...
गोरेगावला विद्यार्थ्यांचा आनंदी बाजार
मॉडेल व्हिलेज गोरेगाव विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी तालुयातच नव्हे तर जिल्ह्यात ओळखले जाते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञानासाठी आनंद बाजार उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत ग्रामीण भागातील आठवडे बाजार प्रमाणे शाळेमध्ये धान्य, भाजीपाला, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले. आनंद बाजारातून प्रेरणा घेऊन उद्याचे उद्योजक तयार होतील. व्यवसाय हा सामूहिक आर्थिक प्रगतीचा केंद्र बिंदू आहे असे मत सरपंच सुमन तांबे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच सुमन बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे, माजी उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य अनुसया नरसाळे, मंदा चौरे, शाळेचे मुख्याध्यापक संजय घायवट, शिक्षिका मंगल नरसाळे उपस्थित होते. उपक्रमशील शिक्षिका नरसाळे यांनी यावेळी शाळेमध्ये पालक महिला व गावातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. त्यामुळे या आनंद बाजारात महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. मुलांना देखील आयते ग्राहक मिळाले. गावातील ग्रामस्थांनी देखील यावेळी आनंद बाजारात येऊन खरेदी केली.
COMMENTS