वडनेर हवेली येथे धर्मनाथ यात्रा उत्सव निमित्त आरोग्य तपासणी शिबिर पारनेर | प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये नियमित आहार नियमित व्य...
वडनेर हवेली येथे धर्मनाथ यात्रा उत्सव निमित्त आरोग्य तपासणी शिबिर
सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये नियमित आहार नियमित व्यायाम केला पाहिजे. आरोग्य सदृढ ठेवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. बालकाच्या जन्मापासून त्याच्या आरोग्यावर लक्ष दिल्यास भविष्यात त्याला येणार्या समस्या उद्भवत नाहीत. भावी पिढी सुदृढ, निरोगी,बौद्धिक दृष्ट्या सक्षम करणे आपल्या हातात आहे असे मत बालरोग तज्ञ डॉ. संपत केदारे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुयातील वडनेर हवेली येथे श्री धर्मनाथ बीज उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच मोफत आरोग्य तपासणी व विनामूल्य औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. केदारे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. संपत केदारे, ज्ञानदेव लंके गुरुजी, डॉ. समयोजिका केदारे, डॉ. आकाश सोमवंशी, रश्मी पाटील, डॉ. आर. जी. सय्यद, डॉ. बाळासाहेब कावरे, सुशांत खांदवे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामदास केदारे, सोपान औटी आदी उपस्थित होते.
डॉ. केदारे म्हणाले, नियमित आरोग्य तपासणी करून घेतली तर आपले आयुर्मान वाढेल. बाळांचा पाच वर्षापर्यंत मेंदूचा विकास होत असतो व तोच मेंदू त्याला भविष्यात उपयोगी पडत असतो. स्त्री सदृढ असेल तर निरोगी बाळ जन्माला येते. आजचे सुदृढ बाळ हे उद्याचे राष्ट्राचे भविष्य असल्याचे डॉ. केदारे यांनी सांगितले.
डॉ. आर. जी. सय्यद म्हणाले धार्मिक सप्ताह मध्ये अशा पद्धतीने आरोग्य शिबिराच्या आयोजन करणे काळाची गरज बनली आहे. डॉ. बाळासाहेब कावरे म्हणाले की ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे. त्यांच्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी पुढाकार घेत असतो. आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नाने आपण अनेक गरजूंना वेळोवेळी मदत करत असतो. यापुढेही करत राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पारनेर जनरिक स्वस्त औषधी सेवा संस्थेचे सुशांत खांदवे यांनी मोफत औषधांचे वितरण केले.यावेळी ज्ञानदेव लंके गुरुजी, हभप बाळकृष्ण महाराज सोनुळे, समयोजिका केदारे, सोपान काका औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. आरजी सय्यद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रावसाहेब रेपाळे, भास्कर भालेकर, भाऊसाहेब भालेकर, अरुण बढे, सौरभ वाळुंज, राहुल सोनुळे, निलेश बढे, विलास भालेकर, शारदा दरेकर, साहेबराव भालेकर, अमोल लतांबळे आदी उपस्थित होते.प्रस्ताविक इंजिनीयर सतीश भालेकर, सूत्रसंचालन पत्रकार शशिकांत भालेकर, आभार हभप बबन कुटे यांनी मानले.
वडनेर हवेलीतील २० कुटुंबे आरोग्य सेवेसाठी दत्तकनीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने वडनेर हवेलीच्या दहा कुटुंबांना एक वर्षासाठी हॉस्पिटल व औषधोपचार चा खर्च केला जाणार असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब कावरे यांनी दिले. तसेच दहा कुटुंबांचा हॉस्पिटलचा खर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून व त्यांच्या ५०% औषध उपचाराचा खर्च जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती इंजिनीयर सतीश भालेकर यांनी दिली. धर्मनाथ बीज यात्रा उत्सव निमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरात वडनेर हवेली गावातील गरीब गरजू कुटुंबातून वीस ईश्वरचिठ्या टाकण्यात आल्या. या वीस व्यक्तींना आरोग्याच्या सर्व समस्यांसाठी नीलेश लंके प्रतिष्ठान व जाणीव फाउंडेशनच्या सदस्यांनी दत्तक घेतले आहे.
आरोग्य सेविका, आशा सेविकांचा सत्कारकोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य सेविका स्वाती भालेकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले. तसेच वडनेर हवेली येथील आशा सेविका पूजा भालेकर यांनी कोरोना काळात गावात उत्तम काम केले म्हणून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
COMMENTS