मुंबई । नगर सह्याद्री - पिंपरीत ईडीची छापेमारीमध्ये दि. सेवा विकास कॉ. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अमर साधुराम मूलच...
मुंबई । नगर सह्याद्री -
पिंपरीत ईडीची छापेमारीमध्ये दि. सेवा विकास कॉ. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अमर साधुराम मूलचंदानी (वय ६०, रा. पिंपरी,पुणे) यांच्यावर बँकेच्या कर्जनिधीचा गैरवापर, व्यवसाय विकास आणि वाहन खरेदीच्या नावाखाली बोगस कर्जप्रकरण मंजूर केल्याचा आरोप आहे.
मूलचंदानी हे पिंपरी - चिंचवडचे माजी नगरसेवक आहे. या गुन्ह्यात सागर सूर्यवंशी, शीतल तेजवानी ऊर्फ शीतल सूर्यवंशी, बँकेचे व्यवस्थापक हरीश लक्ष्मणदास चुगवाणी, लेखापाल पूजा पोटवानी, मुख्य व्यवस्थापक नीलम सोनवानी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश हिंदुजा, हिरू मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लाखानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले आहे. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.
COMMENTS