अहमदनगर | नगर सह्याद्री आहाराचा व आरोग्याचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. एकमेकांचे ते मित्र आहेत आहार व आरोग्य यामध्ये भावना व विचार यांचा स...
आहाराचा व आरोग्याचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. एकमेकांचे ते मित्र आहेत आहार व आरोग्य यामध्ये भावना व विचार यांचा समतोल असला कि मन आनंदी राहते. आहार हा आरोगाचा मुख्य पाया आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन मानसिक आरोग्य मजबूत असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.रोहिणी गवळी यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयात माता-पालक संघाचा तिळगुळ समारंभ व हळदी-कुुंकूवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांसाठी आरोग्यावर आहाराचा परिणाम काय होतो या विषयावर डॉ.गवळी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.सुनिता घाडगे, आयोजिका सौ.आशा गावडे, माता-पालक संघाच्या अध्यक्षा आनंदी घुले, उपाध्यक्षा शुभांगी ढाकणे, सुनिता त्र्यंबके, वैशाली शिर्के, सुरेखा नवले, स्नेहल कारंमपुरी, सुजाता दरे, अर्चना यंगलदास, आदि उपस्थित होते.डॉ. गवळी पुढे म्हणाल्या, स्त्री ही कुटूंबाची उर्जा, पाया आहे. तिचे आरोग्य चांगले राहिले तर कुटूंबाकडे ती चांगले लक्ष देऊ शकते. मन हे चंचल असते, मन वैचारिक व भावनिक असते. शरीर दिसते पण मन दिसत नाही. आनंदी मन ठेवण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. त्यासाठी फिरणे, योगा, चांगले विचार, ध्यान करणे, नामस्मरण करणे आदि गोष्टी केल्या की मन स्थिर राहते व आनंद मिळतो.अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनिता घाडगे यांनी आहार हे एक प्रकारचे औषध असते. ऋतुच्या बदलाप्रमाणे आहारात बदल केला तर आपण बहुतेक आजारांपासून दूर राहू शकतो. भारतीय स्त्रीयांमध्ये एच.बी.चे प्रमाण नॉर्मल नसते. कारण आहारातील निष्काळजीपणा हे मुख्य कारण आहे. सकस आहार घ्या, यामुळे थकवा वयस्कर जाणवत नाही, असे सांगून डॉ.घाडगे यांनी डि-व्हिटॅमीन शरीराला आवश्यक असते. ८ सूर्यनमस्कार घातले तरी हे व्हिटॅमिन मिळते. कॅल्शियम वाढते, आहार पचनास मदत होते, असे सांगितले.प्रास्तविक आशा गावडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.सविता वाघुले यांनी तर आभार जयश्री केदार यांनी मानले. यावेळी सौ.शेळके, सौ.वाळके आदिंसह माता-पालक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
COMMENTS