हत्तलखिंडी शाळेत शालेय साहित्य वाटप पारनेर | नगर सह्याद्री गावामधील विविध विकासकामे आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पुर्ण करणार आहोत. ...
हत्तलखिंडी शाळेत शालेय साहित्य वाटप
पारनेर | नगर सह्याद्रीगावामधील विविध विकासकामे आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून पुर्ण करणार आहोत. विविध योजनेंतर्गत कामे पुर्ण करण्यात येईल विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे. गाव व शाळेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन नुतन लोकनियुक्त सरपंच गजराबाई गायकवाड यांनी केले.
हत्तलखिंडी (ता.पारनेर) येथे संतोष झावरे यांच्या प्रयत्नातून रांजणगाव (जि.पुणे) येथील कल्याणी टेनोफोर्ज लिमिटेड या कंपनीच्या सी.एस.आर फंडातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २ लाख रूपये किमतीचे दोन संगणक संच, शाळा परीसरात पेवर ब्लॉक, दोन ऑफिस कपाट, विविध खेळणी साहित्य, दोन फळे (ग्रीन बोर्ड) देण्यात आले. याचे वितरण सरपंच गायकवाड व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योजक महेंद्र गायकवाड, अनंत आंधळे, रोहीत कुलकर्णी, विठ्ठल चुंगीवदार, बी.जी.ठुबे, योगेश शेळके, शंकर शेळके, सुधीर शेळके, उत्तम गायकवाड, बहिरू गायकवाड, संतोष शेळके, केंद्रप्रमुख विजया नवले, प्राचार्य राजेंद्र ठुबे, शिक्षक सचिन गाडीलकर, उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, कंपनीच्या माध्यमातून शाळेसाठी शैक्षणिक साहित्य उपल्बध झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याचा उपयोग होणार आहे.
COMMENTS