निघोज | नगर सह्याद्री २१ जानेवारी २०१७ रोजी निघोज गावचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची निघोज येथील एस टी बस...
२१ जानेवारी २०१७ रोजी निघोज गावचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची निघोज येथील एस टी बस स्थानक परिसरात निघृण हत्या करण्यात आली. या निघृणपणे केलेल्या हत्येचा निषेध म्हणून गेली पाच वर्षांपासून निघोज ग्रामस्थ, व्यवसायीक, व्यापारी दरवर्षी २१ जानेवारी रोजी नियमितपणे परिसरातील व्यवहार बंद ठेवून काळा दिवस पाळतात. यावर्षी शनिवारी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
तसेच सायंकाळी सहा वाजता संदीप पाटील चौक ते नवी पेठ, एस टी बस स्थानक परिसर, जुनी पेठ ते ग्रामपंचायत चौक या ठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार असून ग्रामपंचायत चौकात या कँडल मार्च विसर्जन होउन या ठिकाणी संदीप पाटील वराळ यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. दरवर्षी काळा दिवस पाळत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा ठराव दि. २६ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. दरवर्षी या ठरावाची अंमलबजावणी ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने करीत असतात.
COMMENTS