नवी दिल्ली । नगर सह्याद्री - ओडिशाचे आरोग्य मंत्री नब दास यांच्यावर रविवारी गोळ्या झाडण्यात आल्या आहे. ब्रजराजनगर येथे काही संशयितांनी त्या...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
ओडिशाचे आरोग्य मंत्री नब दास यांच्यावर रविवारी गोळ्या झाडण्यात आल्या आहे. ब्रजराजनगर येथे काही संशयितांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. नब दास रविवारी ब्रजराजनगर येथील गांधी चौकात आयोजित एका कार्यक्रमाला जात होते. त्यावेली पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. त्यात दास यांच्या छातीत 4 ते 5 गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. सध्या नब दास यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
नब किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले आहे. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. नब दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.
COMMENTS