अहमदनगर | नगर सह्याद्री एटीएम कार्डची अदलाबदल करून एका वृद्धाच्या बँक खात्यातून चार लाख २३ हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. मंगळवारी दुपार...
अहमदनगर | नगर सह्याद्री
एटीएम कार्डची अदलाबदल करून एका वृद्धाच्या बँक खात्यातून चार लाख २३ हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. मंगळवारी दुपारी सावेडी उपनगरात ही घटना घडली. फसवणूक झालेल्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनोळखी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार राधेय जगताप (वय ६८ रा. पंचवटी कॉलनी, पाईपलाइन रोड) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. ते न्यु आर्ट्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत. ते मंगळवारी (दि. १०) दुपारी अॅसेस बँकेचे एटीएम (डेबिट) कार्ड घेऊन सर्जेपुरा येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये गेले होते. तेथे त्यांनी अॅसेस बँकेच्या एटीएम कार्डवरून दोन हजार रूपये काढले. फिर्यादी पैसे काढत असताना त्यांच्या मागे तीन अनोळखी इसम होते. ते हिंदीतून बोलत होते. ते सर्वजण एकाच वेळी फिर्यादीला म्हणाले, तुमचे ट्रांजेशन बरोबर झाले नाही, त्यामुळे आम्हाला पैसे काढता येत नाहीत. तुम्ही परत तुमचे एटीएम कार्ड मशीनमध्ये टाका नंतरच तुमचे अगोदरचे ट्रांजेशन रद्द होईल.फ असे सांगितल्याने फिर्यादी यांनी परत त्यांचे कार्ड मशीनमध्ये टाकले. पैसे विड्रोल होण्याची प्रक्रीया पुन्हा चालु झाली. त्यावेळी एटीएम मशीनमध्ये काही बटने त्या तीन अनोळखी इसमा पैकी एकाने दाबली. त्यावेळी एटीएममधुन ५०० रूपये फिर्यादी यांनी काढुन घेतले. या दरम्यान त्या इसमांनी फिर्यादी यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून त्यांना दुसरे एटीएम देऊन ते निघुन गेले. दुपारी २:२८ वाजता फिर्यादीला एक लाख रूपये ऑनलाईन ट्रांजेशन झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. पुन्हा अॅसेस बँक खात्यातुन २० हजाराचे प्रत्येकी चार ट्रांजेशन, ३० हजार रूपयाचे एक ट्रांजेशन तसेच १३ हजार रूपयांचे एक ट्रांजेशन झाल्याचे मेसेज आले. असे एकुण चार लाख २३ हजार रूपये खात्यातून काढुन घेण्यात आले. फिर्यादीने अॅसेस बँकेच्या सावेडी रोड शाखेत संपर्क साधून त्यांच्या खात्यावरील सर्व ट्रांजेशन बंद करण्यास सांगितले. नंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
COMMENTS