न्यूयॉर्क : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा हादरली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्य...
न्यूयॉर्क : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा हादरली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या. सोमवारी संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडली, या घटनेत ७ ठार झाले. आयोवा राज्यात झालेल्या गोळीबारात दोघांना जीव गमवावा लागला, एक जखमी झाला. हाफ मून बे परिसरातील घटनेत एकाला अटक केली आहे. आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एक शिक्षक जखमी झाला आहे.
COMMENTS