मुंबई । नगर सह्याद्री - पाकिस्तानात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. पाकिस्तानातील सुदूर बलूचिस्तान येथील लासबेला येथ...
मुंबई । नगर सह्याद्री -
पाकिस्तानात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. पाकिस्तानातील सुदूर बलूचिस्तान येथील लासबेला येथे ही दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली हायस्पीड बस खोल नाल्यात पडली आहे. अपघात इतका भीषण होता की बस नाल्यात पडताच पेट घेतला आहे. बस कराचीहून क्वेट्टाला जात होती.
बसमध्ये 48 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडल्याने बचाव कार्यात खूप अडचणी आल्या आणि अंधारामुळे पोलिसांची अडचण होत होती.
COMMENTS