अहमदनगर | नगर सह्याद्री नगर-औरंगाबाद महामार्गावरील असलेल्या पोखर्डी (ता. नगर) येथील रस्त्यावर असलेल्या नासीर खान यांच्या गादी कारखान्याला भ...
नगर-औरंगाबाद महामार्गावरील असलेल्या पोखर्डी (ता. नगर) येथील रस्त्यावर असलेल्या नासीर खान यांच्या गादी कारखान्याला भीषण आग लागली. सुमारे तीन तासानंतर आगीची तिव्रता कमी झाली.
या आगीमध्ये गादी कारखाना पूर्णतः जळून खाक झाला तर इतर दुकानांनाही त्याची झळ पोचली. आग लागल्याची घटना अहमदनगर महापालिकेच्या अग्नीशामक दलाला सकाळी ११ वाजून दहा मिनिटांनी मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या अग्रीशामक विभागाच्या गाड्यांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. गजराज नगरच्या पुढे औरंगाबाद महामार्गावर ही आग लागलेली होती. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापूस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. शेडमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस ठेवलेला होता. आग विझविण्यासाठी महापालिका अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांच्या सात फेर्या झाल्या. दुपारपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. दुपारी साडेबारानंतर आगीची तिव्रता कमी झाली असली तरी आग मोठी असल्याने ती उशीरापर्यंत धुमसत होती.
आग विझविण्यासाठी महापालिका अग्नीशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक बाळासाहेब घोरपडे, चिंधू भांगरे, भरत पडगे, बाबासाहेब कदम, मच्छिंद्र धोत्रे यानी परिश्रम घेतले. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले तेथे दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. अग्नी तांडवात नुकसान झालेल्या व्यापार्यांना त्यांनी धीर देत मदतीचे आश्वासन दिले. नगरसेवक सुनील त्रिंबके, दत्ता तपकिरे, सागर कर्डिले, बबलू सुर्यवंशी, सागर निमसे आदींनी घटनास्थळी भेट दिली.
COMMENTS