वातावरण बदलाचा पिकांना मोठा फटका: कांद्याचा वांधा अहमदनगर | नगर सह्याद्री शहर व परिसराने शुक्रवारी (दि. २७) दाट धुयाची शाल पांघरली. थंडी, प...
वातावरण बदलाचा पिकांना मोठा फटका: कांद्याचा वांधा
शहर व परिसराने शुक्रवारी (दि. २७) दाट धुयाची शाल पांघरली. थंडी, पाऊस व आता सर्वत्र धुके असल्याने वातावरणातील मोठा बदल अनुभवायास मिळत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील या वातावरण बदलाच्या मोठा फटका रब्बी हंगामाला बसला आहे.
पहाटेपासूनच अहमदनगर शहर व परिसरात धुके असल्यामुळे अनेक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलेला होता. अहमदनगर शहर व परिसरात मंगळवारी रात्री हलका पाऊस झाला. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हलका पाऊस झाला होता. औरंगाबादेतही सलग तीन दिवस पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका व हरभरा या पिकांना फटका बसला आहे.
राज्यभरात सध्या असेच वातावरण पाहायला मिळत आहे. अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शयता असल्याने शेतकर्यांनीही धसका घेतला आहे. प्रामुख्याने ढगाळ वातावरणामुळे हरभरा व गव्हाच्या पिकांवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर कांद्याच्या पिकावर देखील परिणाम जाणवणार आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मार्च महिन्यात लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येणार होता. मात्र अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पिकावरही परिणाम झाला. काही भागात पावसामुळे कांदा सडून गेला आहे. काही भागात ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर प्रादुर्भाव झाला आहे.
अगोदर थंडी, नंतर अवकाळी पाऊस व आता धुयामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. अहमदनगर शहरातील सावेडी, दिल्ली गेट, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी, नालेगाव, माळीवाडासह उपनगरांमध्ये पहाटेपासूनच धुके आहे. सकाळी धुयाबरोबरच वातावरणात गारवा आणि सूर्यप्रकाश असल्याने थंडी, धुके, ऊन या तिन्ही गोष्टी अनुभवास मिळाल्या.
काँग्रेस नेते, पदाधिकार्यांना आता बंधन राहणार का?
जिल्हा समिती बरखास्त झाल्याने पर्याय निवडण्यास मोकळ
२९ जानेवारीनंतर थंडीची लाट
राज्यात आणखी तीन दिवस कडायाची थंडी पडणार आहे. राज्यात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शयता आहे. फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच, राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शयताही वर्तवल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात पावसाची शक्यता
महाराष्ट्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर आणि पूर्व भागातून येणार्या वार्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शयता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
COMMENTS