पोलिसांनी चालानमध्ये सांगितले आहे की, आरोपी राहुल नवलानी याने वैशालीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता.
मुंबई / नगर सह्याद्री -
ससुराल सिमर का... टीव्ही मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या एंगेजमेंट नंतरच तिने आत्महत्या केली. आता या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात चालान सादर केले आहे. पोलिसांनी चालानमध्ये सांगितले आहे की, आरोपी राहुल नवलानी याने वैशालीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता. वैशालीचे एंगेजमेंट झाल्यानंतर राहुलने हा व्हिडिओ तिच्या मंगेतराला पाठवला, त्यामुळे तिचे लग्न मोडले. यानंतर वैशालीने आत्महत्या केली होती.
हा व्हिडिओ ऑगस्ट २०२१ मध्ये गोव्यात बनवण्यात आला होता. येथे वैशाली राहुलसोबत गोव्यातील एका हॉटेलमध्ये तीन दिवस होती. दोघेही गोव्याला फिरायला आले होते आणि दोघांमध्ये लग्नाची चर्चा होती. यादरम्यान राहुलने तिचा व्हिडिओ बनवला. याची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी वैशालीचा मंगेतर मितेश गौर यांच्याकडूनही माहिती मागवली आहे.
या प्रकरणात आरोपी राहुल नवलानी याला जामीन मिळाला असून, वैशालीच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप नोंदवला होता. आता पुन्हा एकदा पोलिसांच्या चालानमुळे राहुलच्या अडचणी वाढू शकतात.
वैशालीने लोकप्रिय टीव्ही शो ससुराल सिमर का.... मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारली होती. ती खूप लोकप्रिय होती आणि तिला तिच्या कारकिर्दीतही सतत यश मिळत होते. 'ये रिश्ता क्या कहलाता है...' या टीव्ही मालिकेत संजनाच्या भूमिकेतून वैशालीलाही खूप प्रसिद्धी मिळाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये, वैशालीने इंदोरच्या साईबाग कॉलनीतील तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राहूल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्याविरुद्ध कलम ३०६ (हत्येसाठी प्रवृत्त) गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS