मुंबई । नगर सह्याद्री - शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून जात असताना दिसले राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यां...
मुंबई । नगर सह्याद्री -
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कारमधून जात असताना दिसले राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पडत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्षस्थानी आहे.
या कार्यक्रमावेळी भारती विद्यापीठ परिसरात खासदार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या कारमधून एकत्र प्रवास करताना दिसले. दोन दिग्गज राजकीय नेत्यांच्या एकत्र प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आज पुण्यात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ सुरू आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार हॉस्पिटलचे उदघाटन होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहे.
आज पुण्यात डॅा. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल आणि स्टुडंटस् हौसिंग कॅाम्पेक्सचा उद्घाटन कार्यक्रम सुरू आहे. यावेळी कांग्रेस नेते विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना फडणवीस यांच्या पाया पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आहे.
COMMENTS