नवी मुंबई / नगर सहयाद्री- एका सत्तर वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक केली आहे. दरम्यान खूनानंतर संबंधिताने महिलेच्या अंगावरी...
नवी मुंबई / नगर सहयाद्री-
एका सत्तर वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक केली आहे. दरम्यान खूनानंतर संबंधिताने महिलेच्या अंगावरील दागिने गायब केले हाेते. त्याने ते गहाण ठेवल्याची माहिती समाेर आली आहे. आता पाेलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
उरण मधील बोकडविरा गावात राहणाऱ्या लिलाबाई ठाकुर या जेष्ठ महिलेची हत्या करून फरार झालेल्या अमोल शेलारला उरण पोलिसांनी नगर येथुन अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अमोल शेलार हा नेहमी दारु पिऊन रुमवर येत होता. ताे लिलाबाई यांच्याकडे भाड्याने राहत हाेता.लिलाबाईंनी त्याला वीस हजार रुपये उसने दिले होते.घरभाडे देखील देत नव्हता. पैसे देत नसल्याने लिलाबाईंनी अमोल याला रुम साेडण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याने चिडून लिलाबाईंचा खून केला.
लिलाबाईंच्या घरातील नव्वद हजार रुपयांचा सोन्याचा हार आणि लिलाबाई यांच्या अंगावरून सात तोळे वजनाचे दागिने घेऊन पळ काढला हाेता. त्याला नगर येथे अटक करण्यात आली आहे. त्याने दागिने शिरूर येथील एका पतपेढीत गहाण ठेवल्याची माहिती समाेर आली आहे असेही पाेलिसांनी नमूद केले.
COMMENTS