अहमदनगर / नगर सहयाद्री - अनेक वर्षांपासून तांबे हे काँग्रेसचे इमानदार पाईक मानले जात होते. सत्यजित तांबेनी केलेली राजकीय खेळी मुळे राजका...
अहमदनगर / नगर सहयाद्री -
अनेक वर्षांपासून तांबे हे काँग्रेसचे इमानदार पाईक मानले जात होते. सत्यजित तांबेनी केलेली राजकीय खेळी मुळे राजकारणाने वेगळच वळण घेतले आहे. काँग्रेस बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना समर्थन देणाऱ्या बाळासाहेब साळुंखे यांच्यावर पक्षातून हकलपट्टी करण्यात आली होती. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे आम्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा चार्ज देत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक एक अनोखा ट्विस्ट पहायला मिळाला. सत्यजीत तांबे याचे सोशल मीडियावरुन काँग्रेस पक्षाशी घट असणारे नाते आत्ता हटवले आहे.सत्यजीत तांबेला समर्थन देणारे बाळासाहेब साळुंखे यांची ही प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यकारणी देखील बरखास्त करण्यात आली होती.
आजच्या महाविकास आघाडीच्या आयोजित बैठकीत, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे आहे. जिल्हा काँग्रेस कार्यकारणी देखील बरखास्त करण्यात आली होती. किरण काळे याच्याकडे आम्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ही देत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज केली.
COMMENTS