मुंबई - शाहरुख खानच्या पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला आहे, पण तरी सगळी...
मुंबई -
शाहरुख खानच्या पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला आहे, पण तरी सगळीकडे याचं अडवांस बुकिंग अगदी जोरात सुरू आहे, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला.
दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बर्याच लोकांनी यावर टीका केली तर काही कलाकारांनी या गाण्यावर वेगवेगळे रील्स बनवून या चित्रपटाला आणखी पाठिंबा दिला. भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये नम्रता भगव्या रंगाची बिकिनी घालून समुद्रात हॉट डान्स करताना दिसली होती.
या व्हिडिओची आणि नम्रताच्या हॉट आणि बोल्ड लूकची प्रचंड चर्चादेखील झाली. अनेकांनी भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे तिला ट्रोलही केलं आहे. आता नम्रताने पुन्हा शाहरुख खान दीपिका पदूकोणच्या पठाण’ चित्रपटातील आणखी एका गाण्यावर असाच एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. झुमे जो पठाण’ या गाण्यावर नम्रताने आकाशी रंगाची बिकिनी परिधान करून एक हॉट डान्स व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
COMMENTS