मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीत युतीचा निर्णय झाल्यास तो आम्हाला मान्य असेल, असे मुंब...
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीत युतीचा निर्णय झाल्यास तो आम्हाला मान्य असेल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी म्हटले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना भाई जगताप म्हणाले, आज राज्यातील आणि देशातील एकूण परिस्थिती बघता, युतीबाबत महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय होत असेल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जून खरगे यांना मी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने लढू देण्याची विनंती केली होती. मात्र, मी त्यांना हेही सांगितले की जर केंद्रीय नेतृत्वाने युतीचा निर्णय घेतल्यास तो मला मान्य असेल. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. त्यांची संविधानाशी, लोकशाहीशी बांधिलकी आहे. आमचीही लोकशाहीशी बांधिलकी आहे. त्यामुळे आम्हाला युतीचा निर्णय मान्य करावाच लागेल.
COMMENTS